इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुम्ही वेळेचे व्यवस्थापन किती उत्तम करता, यावर यश अवलंबून असते. साधे सूत्र आहे... वेळेचा जितका योग्य उपयोग तुम्ही कराल, तितकी तुमची झेप मोठी! या पुस्तकामध्ये वेळेच्या व्यवस्थापनाच्या 21 पद्धती दिलेल्या आहेत. त्यांचा वापर केल्यास उत्पादकता वाढवणारे किमान दोन तास प्रत्येक दिवशी तुमच्या हाती निश्चितपणे लागतील. कामात सातत्याने येणारे व्यत्यय; जसे सततच्या मीटिंग्ज, ई-मेल्स व फोन कॉल्सचा भडिमार यांचे नीट नियोजन करा, प्राधान्य असलेल्या कामांना पुरेसा वेळ द्या, कामावर लक्ष केंद्रित राहण्यासाठी समान स्वरूपाची कामे एकत्रित करा, चालढकल करण्याच्या प्रवृत्तीवर मात करा, इतरांवर नेमके काय काम सोपवायचे, ते मनाशी पक्के ठरवा, कठीण ध्येयांच्या पूर्तीसाठी भविष्यात डोकावून काम करा... यांसारख्या तुम्हाला सहज अमलात आणता येईल, अशा पद्धती या पुस्तकात सांगण्यात आल्या आहेत, त्यामुळे कमीत कमी वेळेत अधिकाधिक काम पूर्ण करण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.