कोणत्याही कंपनीमध्ये , तिथे काम करणाऱ्या विक्रेत्यांपैकी आघाडीचे केवळ २० टक्के लोक हेच कंपनीच्या सर्व विक्री पैकी ८० टक्के विक्री करतात. त्यांना हे शक्य होतं . कारण काही निर्णायक क्षेत्रात ते थोडी अधिक चांगली कामगिरी करून दाखवतात. जर इच्छा असेल तर तुम्ही देखील अशी कामगिरी करू शकता. तुम्ही देखील भरपूर पैसे कमावू शकता आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलंय त्यापेक्षाही अधिक उज्वल आणि यशस्वी कारकीर्द घडवू शकता. या अगदी नेटक्या अशा मार्गदर्शक पुस्तकांमध्ये सेल्स मास्टर ब्रायन ट्रेसी यांनी केवळ २१ सोपे आणि प्रभावी मार्ग अवलंबून आपण विक्री क्षेत्रात घवघवीत यश कसे मिळवू शकतो , हे सांगितले आहे.