महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात.ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू , उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती . ते रसिक व साहित्यिकही होते. "युगांतर", "सह्याद्रीचे वारे", "ऋणानुबंध " ही त्यांची साहित्यसंपदा आहे. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी , यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री या पदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र असून यात त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातल्या अनेक महत्वाच्या घटना नमूद केल्या आहेत. हे आत्मचरित्र , सचिन खेडेकर या गुणी अभिनेत्याच्या आवाजात तुम्हाला ऐकता येईल .