शंकर म्हंटलं की नीळकंठ, अर्धनारीनटेश्वर, तांडव करणारा, राख फासून विहार करणारा, पार्वतीचा पती, लिंगपूजा अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. शंकराची ही विविध रुपं भुलवणारी आणि त्याचवेळी विस्मयचकित करणारी आहेत. या प्रसिद्ध देवतेबाबत प्रचलित असणाऱ्या लोकसमजुती, मिथकं, गाणी यातही खूप वैविध्य आहे. या शंकराच्या या विविध रुपांचा, लोकसमजुतींचा आढावा घेत चिकित्सा करणारं हे नमिता गोखले यांचं पुस्तक शंकराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन तुम्हाला देईल, हे नक्की! ऐका सचिन खेडेकर यांच्या आवाजात 'शंकर'