कर्तबगार महिलांना शाप असतो अस्वस्थतेचा आंतरिक कोलाहलाचा. त्यांचे एक मन सतत कामाचा विचार करत असते, तर दुसरे सतत आपण नक्की कोण आहोत? आपली भूमिका, आपले महत्त्व, आपली किंमत घरात किती आहे या प्रश्नांवर झगडत असते.
‘वाँडर वूमन’ या मार्शिया रेनॉल्डस, लिखित व सुमती बोरसे यांनी त्यांच्या केलेल्या ‘नाविन्याच्या शोधात!’ या अनुवादात, लेखिकेने अनेक सत्ये उदाहरणे देऊन अशा अशांत स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा-प्रेरणा उद्देश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.