भविष्यात आपल्यापुढं काय वाढून ठेवलंय्, याचा विचार करू शकतो, तो माणूस'-- अशी 'माणसा'ची व्याखा मानववंश-शास्त्रज्ञ करतात. 'यंत्रलेखक' या कथासंग्रहात घाटे आपल्याला त्यांना अभिप्रेत असलेल्या भविष्यकाळात घेऊन जात आहेत. पुढचा काळ कसा असेल याबद्दल आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते. निरंजन घाटेंसारखा विज्ञान लेखक जेव्हा त्याबद्दलची गोष्ट लिहितो तेव्हा तिचा आस्वाद घेणं ही रसिकांसाठी मेजवानी असते. ऐका , अभिषेक शाळू , यांच्या आवाजात.
Επιστημονική και επική φαντασία