कोन्सांतिन एड्यॲड्रोविच झिओल्कोविस्की हा व्यवसायाने शाळामास्तरच होता पण तो हौशी शास्त्रज्ञ पण होता. अग्निबाणांचा अवकाशप्रवासासाठी उपयोग करता येईल ही कल्पना सर्वप्रथम त्याच्या डोक्यात आली. इ.स.१८८३मध्ये बाहेर फेकल्या जाणा-या कणांची प्रतिक्रिया म्हणून अग्निबाणाला विरूध्द दिशेने गती मिळते हा विचार कोन्त्सातिनला सुचला. त्याबाबत पुढची सतरा वर्षे तो विचार करत होता त्यातुनच अग्निबाणाच्या गतीचे गणित तयार झाले.आणि एक नवाच इतिहास आपल्यासमोर आला.