राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण ? तिचे काय झाले अखेर ? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, पण उलगडले का त्यांना तृतीय रत्नाचे आणि त्यासाठी एवढा रक्तपात का चालू आहे यामागील रहस्य ? विलक्षण रहस्याने ओथंबलेल्या, चक्रावून टाकणाऱ्या या वादळी कथेत मानवी संवेदना गोठवून टाकण्याचे सामर्थ्य आहे !