पृथ्वीपासून कैक प्रकाशवर्ष दूर असलेल्या जंबू ग्रहावर एक विलक्षण आणि अद्भुत सृष्टी होती. हजारो वर्षांच्या शांतीनंतर एक राक्षसी उत्पात घडवणारी काळी शक्ती द्रेकाच्या रुपात जागी झाली. तो हजारो वर्ष आधी गायब झालेले गूढ मंत्रांचे एक बाड शोधत शेवटी पोचला देमीन रहात असलेल्या अरुंद दरीतील वस्तीत. तेथून सुरु झाले भयंकर उत्पात. अद्भुताने भरलेले रहस्यमय धाडसी पाठलाग. आपल्यातही अचाट अद्भुत शक्ती आहेत ही देमीनला जाणीव झाली ती त्या शक्तीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर. द्रेकाच्या काळ्या विश्वात शिरून देमीन विजय प्राप्त करू शकला का? आपल्या ग्रहाला काळ्या शक्तीच्या तावडीतून मुक्त करू शकला का? क्षणोक्षणी अद्भुताच्या पसाऱ्यात खेचत नेणारी आणि एकाहून एक विलक्षण पात्रे असलेली संजय सोनवणी लिखित कादंबरी ऐका संचित वर्तक यांच्या आवाजात!
Science fiction & fantasy