ही कथा अंत्येष्टिविधीकरणाऱ्या दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची. एका दुर्गम खेडय़ात राहणारा 'दत्तू पुजारी' हा या कांदबरीचा नायक आहे. तो धार्मिक कार्यही करतो आणि अंत्यसंस्कारही करतो. दोन्ही विधी करत असल्यामुळे त्याला गावक-यांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात उमटणारे पडसाद या कांदबरीत टिपण्यात आले आहेत. ५० वर्षापूर्वीपासून आजवरचा कालखंड कादंबरीत चित्रित केला आहे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी आणि अभिव्यक्त केलं आहे "संचित वर्तक " यांच्या आवाजात .