गुन्हेगारी जगताचं आकर्षण नाही असा माणूस विरळाच . रोज वृत्तपत्र उघडलं कि क्रीडा आंणि सिनेमाच्या आधी गुन्हेगारीच्या बातम्या वाचतात. राजकारणाबरोबर गुन्हेगारीच्या बातम्यांना वृत्तपत्रात पहिले स्थान मिळते. या पुस्तकात अशाच गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. यातले सगळे गुन्हे त्या त्या वेळी त्या त्या देशात गाजले होते.