भारताच्या विज्ञानेइतिहासात ज्याचं नाव मोठ्या दिमाखाने शास्त्रज्ञांच्या रांगेत झळकतं ते म्हणजे डॉक्टर होमी भाभा . त्यांनी केवळ संशोधन केला असते तर ते शास्रज्ञपदाला पोहोचलेच असते पण त्यांचं मोठेपण असं कि त्यांना भारतात देखील शास्त्रज्ञ निर्माण करायचे होते त्यासाठी अनेक संस्था उभारल्या . आगामी काळाची चाहूल घेत संशोधनाच्या नव्या पायवाटा चोखल्या. भाभांना भारताच्या अनु ऊर्जा विषयक धोरणाचे शिल्पकार मानले जाते कारण त्यांनी हा कार्यक्रम भारतात रुजवला आणि भरभराटीस आणला .डॉ.भाभांप्रमाणेच विज्ञान क्षेत्रात आपल्या ज्ञान तपाने संशोधन करून नाव मिळवणा-या शास्त्रज्ञांच्या कथा घाटे यांनी सांगितल्या आहेत.