प्रायरी स्कूल ही इंग्लडमधील अतिशय प्रख्यात शाळा आहे. मोठमोठ्या उमरावांनी या शाळेत आपल्या मुलांना घातले आहे. या शाळेची ख्याती ऐकून ड्यूक ऑफ होल्डरनेस यांनी आपल्या दहा वर्षाच्या एकुलत्या एक मुलाला आणि त्यांच्या संपत्तीच्या वारसाला लॉर्ड साल्टायरला या शाळेत घातले आहे. अडीच लाख एकरांचा धनी आणि अनेक उद्योगांत भागीदारी असणा-या या मुलाला प्रायरी शाळेतून पळवून नेलं जातं किंवा तो स्वतःच या शाळेतून पळून जातो. काय आहे या शाळेचे रहस्य ? शेरलॉक होम्स ते कसं ओळखतो ?