शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे अनुवाद मराठीत भालबा केळकर यांनी केले आहेत. सुमारे वीसहून अधिक कथांचे त्यांनी केलेले अनुवाद स्टोरीटेलने ऑडिओ स्वरूपात सादर केले. हे सर्व अनुवाद संदीप खऱे यांच्या आवाजात उपलब्ध झाले आहेत. या निमित्ताने भालबा केळकर यांनी आपल्या सहजसोप्या शब्दात शेरलॉक होम्सचे व्यक्तिचित्र कसे लिहिले गेले आहे व लेखक सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा रहस्यकथा लेखक प्रसिध्द कसा झाला आणि शेरलॉक होम्स इतकी वर्षे लोकप्रिय का राहिला याची कारणमीमांसा अतिशय रंजक आहे.