भारताला विज्ञानाची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभली आहे. सुमारे अडीच – तीन हजार वर्षांपूर्वी भारताच्या सुवर्णयुगात विज्ञानधिष्ठीत जीवन पद्धती भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केली होती. अशा शास्त्रज्ञांची चरित्रे चित्रमय स्वरुपात समाजात उपलब्ध व्हावीत यासाठी भारतीय विचार साधनाने 'चित्रमय भारत भारती' हा प्रकल्प हाती घेतला आहे. अतिशय आकर्षक चित्रे आणि सोबत कथेद्वारे अणुशास्त्रज्ञ कणाद ह्यांनी लावलेले शोध, नोंदवलेली निरीक्षणे आणि त्याद्वारे मांडलेले निष्कर्ष ह्याविषयी श्रोते जाणून घेऊ शकतील.
Ilukirjandus ja kirjandus