‘कर्मं करा, फळाची अपेक्षा करू नका’ हा गीतेतील सिद्धांत आपण नेहमी ऐकतो. जिथे विज्ञान तिथे सिद्धांत आणि जिथे सिद्धांत तिथे सूत्रे. काय आहेत कर्माचे नियम आणि कोणती आहेत ही सूत्रे?
मनुष्य कर्मं करतो तीच मुळी बदल्यात काही मिळेल या अपेक्षेने. त्याचे लक्ष कायम फळाकडे लागलेले असते. मात्र यामुुळे केलेल्या कर्मांच्या गुणवत्तेची पातळी मात्र घसरत जाते. अशा कर्मांमुळे ना त्याला आनंद मिळतो ना मुक्ती!
जेव्हा निष्काम भावनेने कर्मं होतात तेव्हा ती कर्मंच आपलं फळ बनतात, अर्थात ती कर्मंच परमानंदाचे कारण आणि मुक्तीसाठी निमित्त ठरतात. या पुस्तकामधून आपण कर्म नियम आणि त्याची सूत्रे जाणून घेणार आहोत.
या पुस्तकातून काय शिकाल?
– आपल्या कर्मांमागून डोकावणारे आपले चार चेहरे ओळखणे.
– इतरांच्या कर्मांच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवणे.
– श्रेय न घेतल्यामुळे आपल्या कर्मफलावर होणारा सकारात्मक प्रभाव जाणणे.
– कर्म हेच सफल फळ कसे होईल?
– प्रत्येक कर्मासोबत कर्म नियम सूत्र जोडले तर कर्माची गुणवत्ता कशी वाढेल?
– पाच प्रकारच्या इच्छांमधून मुक्ती मिळवल्यास जीवन सफल कसे होईल?
– कर्माला अभिनय बनविल्यास आनंदावस्था कशी येईल?
– तीन प्रकारची कर्मं अर्पण केल्याने महाफळाचे द्वार कसे उघडते?