विक्रीकौशल्याच्या तंत्राचा कानमंत्र देणारे, यशाचे मर्म, रहस्य उलगडणारे हितगुज आणि बोलही...विक्री करण्यासाठी विक्रेत्याला पुढाकार घ्यावाच लागतो. विक्रीचं काम पुढाकार घेतल्याशिवाय होऊच शकत नाही. कित्येक नवशिके सुरुवातीला पुढाकार घेतात, पण नकार मिळाल्यावर लगेचच शेपूट घालून मागे येतात. त्यानंतर ते आयुष्यात कुठेच पुढाकार घेत नाहीत. त्यांना पुढाकाराचा धसकाच बसतो व ते कोशात जातात. मग संपूर्ण आयुष्यभर त्यांची फरफटच होत राहते. पण सेल्समनचं काम किती सोपं आहे हेच या पुस्तकातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त शास्त्रोक्त पद्धतीने विक्री केली तर ती अतिशय सोपी होते आणि मग संपूर्ण आयुष्य सुखी होतं. ज्यांना ज्यांना विक्रीच्या व्यवसायात जायचे आहे अशा सवा|ना शास्त्रोक्त पद्धतीने पुढाकार कसा घ्यायचा, हे शिकता येईल व यशस्वी होता येईल.
Économie et investissement