reportरेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही अधिक जाणून घ्या
या ई-पुस्तकाविषयी
‘शेलका साज’ हा शिवाजी सावंतांच्या निवडक ललितलेखांचा संग्रह. संपूर्ण लेखसंग्रहात सावंतांवर असणारा शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव ठिकठिकाणी जाणवतो पण असे असले तरी इतरही अनेक विषयांचा आढावा हे लेख घेतात. निरनिराळी व्यक्तिमत्त्वे उलगडून सांगताना लेखकाचा सखोल अभ्यास जाणवतो. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याचा निराळाच दृष्टिकोन सावंत वाचकाला देतात. यात कुसुमाग्रज, शिवकाळातील मावळा, औरंगजेब, शिवराय श्रीकृष्ण अशा अनेक व्यक्तिमत्त्वांची उकल ते करताना दिसतात. शिवकालीन मावळ्याचे वर्णन करताना त्याचा पेहराव, त्याचं सैन्यातलं स्थान, लढाई तंत्र, आहार आणि रांगडी राकट भाषा या सगळ्यांचा लेखकाने केलेला सखोल अभ्यास जाणवतो. त्यांच्या वर्णनातून मावळ्याचे, हुबेहूब चित्र समोर उभे राहते. ‘साहित्य अश्वत्थ: कुसुमाग्रज’ या लेखात त्यांच्या आणि कुसुमाग्रजांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. ऐतिहासिक ललितलेखनासाठी आवश्यक असणाNया गोष्टींची त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. इतिहासातील प्रसंग बोलके, जिवंत करताना उपलब्ध पुरावे योग्य पद्धतीने साधणे आवश्यक आहे असे मत ते मांडतात ‘महाभारत जीवनाचा आरसा’ या लेखात ते म्हणतात की मानवी जीवनाला आरसा दाखवील असा दुसरा ग्रंथ जगात नाही. जीवनाला व्यापून टाकणारे तत्त्वज्ञान महाभारतात सांगितले आहे
This is a collection of creative writing from the author of the best seller, 'Mritinjaya'.
Fictie en literatuur
रेटिंग आणि पुनरावलोकने
३.३
३ परीक्षणे
५
४
३
२
१
या ई-पुस्तकला रेटिंग द्या
तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.
वाचन माहिती
स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अॅप इंस्टॉल करा. हे तुमच्या खात्याने आपोआप सिंक होते आणि तुम्ही जेथे कुठे असाल तेथून तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्हाइसवर वाचण्यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्या डिव्हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.