क्रिकेट वगळता इतर खेळांना भारतामध्ये जवळपास काहीच महत्त्व दिलं जात नाही. अशा परिस्थितीत बॅडमिंटनमध्ये रिओ ऑलिम्पिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही. सिंधू या युवा भारतीय खेळाडूनं करून दाखवला. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूनं जिद्द, परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकाचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे सिंधू जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाऊन पोहोचली. इथून पुढेही ती प्रचंड यश मिळवू शकते, असा आशावाद तिनं जागवला आहे. या सिंधूची ही प्रेरणादायी कहाणी.