Important concepts of English Grammar
Day to Day Vocabulary
Analytically sequenced Chapters
Use of Proverbs and Idioms for motivation
For Students and Teachers
For Semi-English and Marathi Medium
भाषासुगंध EG English Grammar ‘ या पुस्तकाचे लेखक, पुरुषोत्तम विठोबा मुळे, हे गेली २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते योगेश्वरी महाविद्यालय, अंबेजोगाई चे माजी विद्यार्थी आहेत. धारूर येथील एका शाळेत लिपिक या पदावर कार्यरत असताना त्यांची इंग्रजी विषयाची आवड बघून त्यांना शिकविण्याची संधी दिली गेली आणि तेंव्हापासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांनी English Speaking, Basics of Grammar, Science इ. विषयात अध्यापन करून विद्यार्थ्यांच्या दोन पिढया घडविलेल्या आहेत. जवळ पास मागील दोन दशके ते DnyanSugandh Academy नावाने स्वतःचे शिकवणी वर्ग चालवतात. अनेक स्थानीय शाळांनी आणि संघटनांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना गौरविलेले आहे. त्यांचा उल्लेख सकाळ, पुण्यनगरी, Times of India या वृत्तपत्रातून झालेला आहे.
आज त्यांचे विद्यार्थी जगभर पोहचले असून अनेक नामांकित कंपन्यात काम करत आहेत. तसेच नामंकित संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. सर्वदूर आणि सर्वव्यापी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार हाच त्यांच्या आयुष्याचा महायज्ञ असून तो सातत्याने, प्रामाणिकपणे वयाच्या साठ वर्षानंतरही दैदिप्यमान आहे