एकोणीसशे सत्याऐंशी सालातले ओशोंचे विचार... आणि आता दोन हजार एक मधल्या घटना... खरोखर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे विचार आज तंतोतंत प्रत्ययाला येत आहेत. या तिसऱ्या भागात विश्वाची कोडी उकलताना त्यांनी सृष्टीला भरभरून धन्यवाद दिले आहेत. इतर प्राणिमात्रांपेक्षा मनुष्यप्राण्याचं जीवन हे जास्त रोमांचकारी आहे हे स्पष्ट करताना वारंवार त्यांनी ठामपणे सांगितलंय की हे ‘प्रकृतीचं देणं आहे...’ ते सांभाळून ठेवा! स्वत:च्या जीवनाची स्वत:च्या हातानं हेळसांड करू नका. आणि त्यासाठी स्वत:चा शोध पहिल्यांदा घ्या. मनुष्याच्या उन्नतीमधला अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक टप्पा म्हणजे स्वत:चा शोध.