ज्ञानभाषा माराठी प्रतिष्ठानची #सर्वत्रमराठी ही महत्त्वाची संकल्पना!! त्यावर आधारित प्रतिष्ठानने आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्र विचारात घेऊन स्थापत्यशास्त्र, पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र,निसर्ग संवर्धन, तंत्रज्ञान असे १०० च्या आसपास समूह तयार केले आहेत.या समूहातून ज्ञानवर्धक चर्चा घडविल्या जातात. विविध स्तरावरून येणारे प्रश्न या गटात विचारले जातात; त्याच्यावर सखोल चर्चा करून "ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या ब्लॉग" वर ती माहिती संकलित करून प्रसारित केली जाते.
याच #सर्वत्रमराठी संकल्पनेमध्ये प्रतिष्ठानने महिलावर्गाचा ही समावेश केला. त्या अंतर्गत "अन्नपूर्णा" आणि "महाराष्ट्रात्मजा" या समूहांची निर्मिती झाली. याद्वारे महिलांचे संघटन करणे आणि मराठी भाषेच्या मुद्द्याकडे महिलावर्गाचा कल वाढवणे ही मूळ संकल्पना आहे.
महिलावर्ग स्वतःच्या लेखणीतून व्यक्त व्हाव्या यासाठी विविध उपक्रम या समूहांतून राबविले जातात. त्यापैकी एक म्हणजे "चित्रकविता!!"
या उपक्रमांतर्गत समूहातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला आणि नव्याने लिहू लागलेल्या महिलांना प्रेरणाही मिळाली. भविष्यात या महिला नक्कीच मराठी भाषा आणि मराठी शाळा यांसाठी कार्यरत राहतील अशी आशा व्यक्त करते.
"चित्रकविता" उपक्रमासाठी ज्यांनी मदतीचे हात दिले त्या डॉ.अस्मिता भिसे,शुभांगी कदम,डॉ.अर्चना चव्हाण,वृषाली गोखले या सदस्यांचे मनःपूर्वक आभार!
या उपक्रमातील सहभागी सर्व महिला सदस्यांचे विशेष कौतुक आणि भविष्यात ही अशाच लिहित्या हाताला कायम लिहिते ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!
मृणाल पाटोळे