Maharashtratmaja 2019

· BRONATO.com
4.8
4 રિવ્યૂ
ઇ-પુસ્તક
103
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

 ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. गेली चार वर्षे सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्षकृतीद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मराठी भाषा आणि मराठी शाळा यांचे मुद्दे सक्षमपणे मांडण्याचे कार्य करीत आहे.

ज्ञानभाषा माराठी प्रतिष्ठानची #सर्वत्रमराठी ही महत्त्वाची संकल्पना!! त्यावर आधारित प्रतिष्ठानने आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्र विचारात घेऊन स्थापत्यशास्त्र, पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र,निसर्ग संवर्धन, तंत्रज्ञान असे  १०० च्या आसपास समूह तयार केले आहेत.या समूहातून ज्ञानवर्धक चर्चा घडविल्या जातात. विविध स्तरावरून येणारे प्रश्न या गटात विचारले जातात; त्याच्यावर सखोल चर्चा करून "ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या ब्लॉग" वर ती माहिती संकलित करून प्रसारित केली जाते.

याच #सर्वत्रमराठी संकल्पनेमध्ये प्रतिष्ठानने महिलावर्गाचा ही समावेश केला. त्या अंतर्गत "अन्नपूर्णा" आणि "महाराष्ट्रात्मजा" या समूहांची निर्मिती झाली. याद्वारे महिलांचे संघटन करणे आणि मराठी भाषेच्या मुद्द्याकडे महिलावर्गाचा कल वाढवणे ही मूळ संकल्पना आहे.

महिलावर्ग स्वतःच्या लेखणीतून व्यक्त व्हाव्या यासाठी विविध उपक्रम या समूहांतून राबविले जातात. त्यापैकी एक म्हणजे "चित्रकविता!!"

या उपक्रमांतर्गत समूहातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला आणि नव्याने लिहू लागलेल्या महिलांना प्रेरणाही मिळाली. भविष्यात या महिला नक्कीच मराठी भाषा आणि मराठी शाळा यांसाठी कार्यरत राहतील अशी आशा व्यक्त करते.

"चित्रकविता" उपक्रमासाठी ज्यांनी मदतीचे हात दिले त्या डॉ.अस्मिता भिसे,शुभांगी कदम,डॉ.अर्चना चव्हाण,वृषाली गोखले या सदस्यांचे मनःपूर्वक आभार!

या उपक्रमातील सहभागी सर्व महिला सदस्यांचे विशेष कौतुक आणि भविष्यात ही अशाच लिहित्या हाताला कायम लिहिते ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

मृणाल पाटोळे

રેટિંગ અને રિવ્યૂ

4.8
4 રિવ્યૂ

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.