IMAGINING INDIA

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.6
14 રિવ્યૂ
ઇ-પુસ્તક
931
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

समकालीन संदर्भात
अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास,
गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक
सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही
चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही
खिळखिळी करणाऱ्या कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन
निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून
उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का
आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाऱ्या क्रांतीमुळे केवळ
व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या
आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या
पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात
दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च
शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या
कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि
संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे. जिथे काही बलाढ्य
कंपन्यांच्या वार्षिक उलाढालीचे आकडे हे छोट्या देशांच्या संपूर्ण
अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठे होत चालले आहेत, अशा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत
शासन संस्थांची नेमकी भूमिका काय; याचाही ऊहापोह निलेकणी यांनी केला आहे.
सार्वजनिक आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात नवविचारांची-नवनिर्मितीची आणि
सुधारणांची गरज अधोरेखित करणारे हे पुस्तक भविष्य तोलून धरू शकतील, अशा
नव्या संकल्पना समोर ठेवते. खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असणाऱ्या लोकशाही
व्यवस्थेपासून सामाजिक सुरक्षेच्या छत्रापर्यंत आणि सार्वजनिक आरोग्याच्या
सक्षम क्षेत्रापासून शाश्वत ऊर्जा-धोरणापर्यंतच्या या नव्या संकल्पना
वर्तमान राजकारणाला ओलांडून पुढे येतील आणि त्यातूनच देशाचे भविष्य आकाराला
येईल, असा युक्तिवाद नंदन निलेकणी यांनी या पुस्तकात मांडला आहे.

રેટિંગ અને રિવ્યૂ

3.6
14 રિવ્યૂ

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.