‘वाणिज्यिक भूगोल (Commercial Geography)’ हा ‘मानवी भूगोल’ या मुलभूत शाखेच्या ‘आर्थिक भूगोल (Economic Geography)’ या उपशाखेतून १८ व्या शतकात उदयास आलेला उपयोजित व विशेषीकृत विषय आहे. ‘वाणिज्यिक भूगोल’ या विषयात व्यापार, वाहतूक, दळणवळण, पर्यटन, बँक, साठवणूक इ. वाणिज्यिक क्रियांचा भौगोलिक संदर्भाने आणि मानवी विकासाच्या हेतूने पध्दतशीर अभ्यास केला जातो.
प्रस्तुत ‘वाणिज्यिक भूगोल-१’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या FYBCom: Semester-I (CBCS Pattern: 2019) भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना अद्ययावत आकडेवारी, रंगीत चित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ‘वाणिज्यिक भूगोल’ हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते.
प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या या भूगोलशास्त्रातील अनमोल कार्यामुळेच भूगोलशास्त्राचे भविष्य उज्ज्वल आहे.
धन्यवाद!!!!
Commercial Geography