Сакате примерок од 2 мин.? Слушајте во секое време, дури и офлајн.
Додај
За аудиокнигава
नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी निवडून आलेल्या पुढार्यांच्या दोर्या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय? अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे. तर यावेळी त्यांच्या समोर त्यांच्याच वर्तमानपत्राचा तरूण संपादक 'राजेंद्र' इच्छुक वर म्हणून उभा! नानासाहेब लावू शकतील का त्याचे लग्न? की सुरूवातीलाच नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं? जाणून घ्या राजेंद्रला नानासाहेब काय अतरंगी सल्ले देतात ते...! ऐका सुहास शिरवळकरांची भन्नाट कथा – 'जरा सल्ल्या-सल्ल्याने'