Želite vzorec dolžine 3 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
'गुळू बेंद्रे'! नावाइतकेच रूप असलेला हा इसम... जन्माला आल्यानंतर सुरूवातीलाच जो काही गप्प बसला असेल तेवढाच, नाहीतर त्याची ओळख झाली तर निरनिराळ्या कारणांनी 'गुळू' दुसर्यांच्या स्मृतीमध्ये चिरंतन होऊन जाई. पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो. त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी! बहिरा असलेला गुळू करू शकेल का ते चॅलेंज पूर्ण? ऐका सु.शि. टच असलेली धमाल कथा- 'वन्डरफुल'