Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
साम गावाच्या चौकातील एका घराच्या भिंतीवर डकवलेले पोस्टर...पोस्टर पाहणारे दोन तरूण... मागे अनेकजणांची गर्दी...पोस्टरवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं...WANTED FOUR !''सनी पटेल... बालम जोगी... मुन्ना... जग्गा !' उत्स्फूर्तपणे त्या तरुणाच्या तोंडून शीळ बाहेर पडली. 'शिक्षा करण्यायोग्य आहेत नाही ?' त्यानं शेजारच्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. 'प्रश्नच नाही.' 'मिळवायचे इनाम?'' अवश्य मिळवू या !' ज्यांनी हे ऐकले त्यांना समजले की, चांडाळचौकडीची शंभरी भरली ! पोस्टर्स पहाणाऱ्यातला एक बादल होता. दुसरा ? दारा ' बुलंद ' ! सु.शिं.च्या पकड घेणार्या लेखणीतून उतरलेली एक वेगवान थरारकथा... 'वॉन्टेड' ऋषी देशपांडेंच्या आवाजात!!!