फकीरा', 'वारणेचा वाघ', 'पाझर', 'वैर' अशा गाजलेल्या आणि जगातील 27 भाषात अनुवादित झालेल्या कादंबर्यांचे लेखक आणि स्वत: कवने रचणार्या शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे चित्रमय चरित्र. शाळेतील मास्तरांची मारहाण, फडावर इंग्रज पोलीसांची धाड इत्यादी रंजक प्रसंगांपासून ते थेट रशियात जाऊन आपल्या कलेची जगाला ओळख करून देण्यापर्यंतच्या वर्णनामुळे हे छोटे चरित्र वाचनीय झाले आहे.