न्यूयॉर्कमध्ये बालपण घालवलेले दोन जिवलग मित्र ऐन तारुण्यामध्ये एकमेकांपासून दूर होतात. एक जण नशीब आजमावण्यासाठी पश्चिमेकडे जातो. दुसरा मात्र त्याच शहरात पोलीस खात्यात दाखल होतो. त्यावेळी त्यांच्यात एक अलिखित करार होतो. बरोबर वीस वर्षांनी कुठल्याही परिस्थितीत नियोजित ठिकाणी भेटायचंच. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी त्याच जागी हजर होतो. वेळ संपत चाललेली असते. दरम्यान एका अट्टल गुन्हेगाराला पकडण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. योगायोगाने त्याचा हा मित्रच तो गुन्हेगार असतो. आता पोलीस मैत्री निभावणार का कर्तव्याचं पालन करणार? ऐका, 'वीस वर्षानंतर' ही ओ हेन्रीची, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा गौरी लागू यांच्या आवाजात.