आमच्या खजिन्यात खच्चून संपत्ती साठत राहिली. 'पाताळपाट' किल्ल्यांतील खजिन्यात सोन्याचा साठा एवढा प्रचंड वाढला की, त्याच्या संरक्षणाचा एक नवाच प्रश्न 'बेडर' घराण्यासमोर उभा राहिला. मग त्या बड्या खजिन्याच्या संरक्षणासाठी खास एक क्लृप्ती लढवण्यात आली. या खजिन्यावर ज्यांचा डोळा असेल, ते आपल्यावर कुलस्वामिनीचा रोष ओढवून घेतील, अशी समजूत बरेचवेळा प्रसृत झाली. डोळे बांधल्याशिवाय कुटूंब प्रमुखालाही या खजिन्यांत शिरायची मनाई झाली. त्या जामदारखान्याचं दर्शन घेण्यासाठी मलाही सव्विसावं वर्ष लागेपर्यंत थांबावं लागलं. पुढे काय झालं, याची उत्सुकता वाटतेय ना? मग ऐका मनोहर माळगावकर लिखित आणि भा.द. खेर अनुवादित 'द प्रिन्सेस' श्रीरंग देशमुख यांच्या आवाजात.