म्हातारपण कोणाला आवडतं ? साठी उलटली तरी आपण अजून कसे तरूण दिसतो, हे ऐकायला, हे सांगायला छान वाटते. काहीजण मात्र त्याचा आनंदानं स्वीकार करतात. प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर ते अवलंबून आहे. ब-याच दिवसांनी भेटलेले मित्र याच विषयावर चर्चा करत आहेत. एकजण तर फक्त ४५ वर्षांचा आहे पण वय वाढल्याच्या वस्तुस्थितीमुळे दुःखी आहे तर दुसरा जास्त वयाचा पण जणु काही आनंदाचा झराच. प्रसन्न, उत्साही आदी गुणांनी संपन्न ! त्याने आपल्या उतारवयाचा स्वीकार कसा केला ?