जयवंत दळवीलिखित मराठी नाटक 'सूर्यास्त' समाजजीवनात कधीकधी असा एखादा काळाकुट्ट कालखंड येतो की, त्यावेळी नि:स्वार्थी व्यक्तींचा सारा त्याग मातीमोल होतो आणि सरळमार्गी सर्वसामान्य माणसं तर केवळ हतबल होतात. स्वार्थी आणि कारस्थानी माणसांनी भरलेल्या या जगात सात्त्विक वृत्तीच्या माणसांची फरपट कशी होते आणि त्यांच्या ध्येयवादी जीवनाचा अस्त कसा होतो, याचं परिणामकारक दर्शन घडवणारं नाटक - 'सूर्यास्त'
Skönlitteratur och litteratur