एका देशाचा राजपुत्र तरूण वयात मरण पावतो. राजधानीतल्या एका टेकडीवर त्याचा मोठा पुतळा उभारण्यात येतो. तो सोनं आणि हिरेमाणकांनी मढवलेला आहे. राजपुत्र तिथून आपल्या राज्यातील श्रमिक, गरिब लोकांची दुःख बघत आहेत. एक चिमकुला पक्षी त्याच्याजवळ आश्रय घेतो. मग तो राजपुत्र त्याच्या अंगावरील सोनं आणि मौल्यवान खडे दुःखी कुटंबांपर्यंत पोहचवण्याची कामगिरी पक्षावर सोपवतो. बघता बघता पुतळ्यातील लोखंड फक्त शिल्लक राहते. थंडीचा कडाका वाढतो. वास्तविक तो पक्षी दुरवरच्या उबदार प्रदेशात जाणार असतो पण तो त्या राजपुत्राची साथ सोडत नाही. मग पुढे काय होतं...?
Ilukirjandus ja kirjandus