कार बंगल्यापाशी येताच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत एक तरूण येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत मुंबईतली अख्खी बदमाषगिरी साठली होती. उद्धटपणे एक गाल उडवून तो सौम्य हसला. "अब देखता हूं, सागर से सरिता का मीलन होता हैं या सूरज मे सरिता खो जाती हैं!" स्वत:शीच तो म्हणाला आणि त्यानं एक प्रचंड हास्य केलं. ऐका, सुहास शिरवळकरलिखित कादंबरी 'सहज' मिलिंद इंगळे यांच्यासह!
Kriminalgåtor och spänning