भगवान महादेवाच्या जीवनावर आधारित कादंबरी! पौराणिक कथा, पुरातत्त्वशास्त्र आणि परंपरा यांवर आधारित असणारी भगवान शंकराची कथा ऐकणाऱ्याला खिळवून ठेवते. भारतातल्या दंतकथा, लोककथा आणि पुराणकथा यांचा हा अप्रतिम मिलाप आहे. देव, संस्कृती, इतिहास, असुर आणि नायक यांच्याविषयीचे आपले दृष्टीकोन कायमस्वरूपी बदलून टाकण्याचं सामर्थ्य या कथेत आहे. नीलकंठाविषयीचं कोणतं रहस्य यापुढे उलगडलं जाणार आहे, याचं कुतूहल सतत वाढत जातं. आपल्या कर्मामुळे ... कर्तृत्वामुळे एक पुरुष देवत्वापर्यंत कसा पोहोचला याची ही चित्तवेधक कहाणी आहे. प्राचीन भारताच्या समृद्ध पौराणिक परंपरेचा वेध या पुस्तकामधून घेतला आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि कल्पनाविलास यांच्यामधून हे पुस्तक आकाराला आलं आहे. भगवान महादेवाच्या जीवनातून शिकवण घेत आपण सारेच जण अधिक चांगल्या व्यक्ती म्हणून जगू शकू. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बनण्याची क्षमता दडलेली असते, हा या कहाणीचा अन्वयार्थ आहे.
Raaisel- en spanningsverhale