'चार शब्द' हे पुलंचं पुस्तक म्हणजे त्यांनी इतर पुस्तकांकरता लिहिलेल्या काही अप्रतिम प्रस्तावनांचा संग्रह होय. उत्तम कलाकृतींना तितकीच मनस्वी दाद देणं हा पुलंच्या स्वभावातला एक महत्वाचा पैलू. अशीच दाद देणारी एक सुंदर प्रस्तावना त्यांनी 'विश्रब्ध शारदा' या ग्रंथाकरता लिहिली होती. 'विश्रब्ध शारदा' हे महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी अनमोल ठेवा असलेलं पुस्तक. या ग्रंथांच्या तिन्ही खंडात कला, साहित्यादि विविध क्षेत्रातल्या थोर व्यक्तींनी अन्य थोर व्यक्तींना लिहिलेली पत्रं समाविष्ट आहेत, अशा पुस्तकाला पुलंनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा इतिहासही रंजक आहे. ऐका, 'विश्रब्ध शारदा' ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्यासह...