" मी एक अभिमन्यु "या एकांकितेत , ज्याप्रमाणे कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहाला अभिमन्यु बळी पडला,अगदी त्याच प्रमाणे इथे सुद्धा अगदी कोवळ्या वयात असणाऱ्या अनंताभोवती एक चक्रव्यूह रचला जातो ...मात्र चक्रव्यूह नियतीने रचला आहे की अनंताच्या आई ,ताई,भाऊ, दुकानदार ,नाना यांनी ? असा प्रश्न अनंता एकांकिकेच्या शेवटी विचारतो..... अशा प्रकारे चक्रव्यूहाचा भेद करता न आलेल्या तरुणाची ही गोष्ट नाटक रूपाने आपल्यापुढे उलगडत जाते .
Художественная литература