संत तुकाराम आणि विठ्ठलाच्या भक्तीचे वर्णन "हेचि दान देगा देवा" मध्ये मंजुश्री गोखले यांनी केले आहे. दोन युगप्रवर्तक महापुरूष, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज एकमेकांना भेटले होते, एकाला हिंदवी स्वराज्य उभारायचं होतं तर दुस-याला भक्तीचं साम्राज्य. एकाकडे शौर्य होतं तर दुस-याकडे शब्द. एक निश्चयाचा महामेरू तर दुसरा भक्तीचा अवतारू. सगळे जग त्या भेटीचा कौतुकसोहळा पाहत होते.