पु.ल.देशपांडे यांनी वेगवेगळ्या प्रसंगी लिहिलेले अनेक लेख खिल्ली मध्ये प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये एका गांधी टोपीचा प्रवास, पु.ल. तुम्ही स्वतःला कोण समजता, भाईसाहेबांची बखर, तुम्हाला कोण व्हायचं आहे? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर या सारखे अनेक लेख आहेत. महाराष्ट्र प्रदेशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर, व्यक्तींवर, घटनांवर वेगवेगळ्या निमित्ताने टिप्पणी करत लिहिलेले हे लेख म्हणजे हसत हसत स्वतःच्या आत डोकावून पहायला लावतात .
Skönlitteratur och litteratur