महानगरी, विशेषतः मुंबईच्या आधुनिक वेगवान आयुष्यानं लादलेले ताणतणाव, नातेसंबंधांमधला ओलावा जपताना होणारी ओढाताण, यातून होणाऱ्या अपरिहार्य गुंतागुंतीतून मतकरींची कथा फुलत जाते. तारुण्याच्या उंबरठ्यावर शाळकरी वयातल्या आठवणींचे तपशील, उमलू लागलेलं चौकस कुतूहल, भिन्नलिंगी आकर्षण आणि पौडांगावस्थेतलं वय, त्यातून आई- वडिलांमधील आणि मुलांमधील विसंवाद, एकूणच काय? कुठे? कसं? याबद्दलच्या इमॅजिनेशनला आव्हान देत 'कदाचित'मधल्या कथा पुढे सरकतात.
Ilukirjandus ja kirjandus