हाडकी हाडवळा म्हणजे महारांना मिळालेली सामूहिक जमीन! या इनामांची मूळं थेट निजामशाहीच्या अंमलापर्यंत पोहचतात. आंबेडकरी संस्कारांनंतर काव्य आणि कथा या साहित्यप्रांतामध्ये जोरकस आणि आक्रमक प्रवेश करून दलित साहित्याने सारे साहित्यविश्व दणाणून सोडले. कादंबरी क्षेत्रात दलितांची अशी भरारी जाणवली नाही. १९८०-८१ मध्ये ही कादंबरी आली तेव्हा वाटले की एक नवी वाट तयार होते आहे.
Skönlitteratur och litteratur