रिचर्ड फिलिप्स फाइनमन हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला होता. त्यांचेच हे प्रेरणादायी चरित्र !