दोन मुलांचा एकहाती सांभाळ करणाऱ्या सिंगल पॅरेंट प्रियांका कोथमिरे यांनी एक आगळावेगळा व्यवसाय सुरु केला. फ्रोटेल्स डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाशांना तासांवर हॉटेल्स उपलब्ध करून देण्याचा हा व्यवसाय. वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना अनेकदा केवळ काही तासांसाठीच हॉटेलची रुम घ्यावी लागते, आणि पैसे मात्र पूर्ण दिवसाचे भरावे लागतात. ही अडचण लक्षात घेऊन, लोकांना हॉटेल्सच्या रुम्स तासांच्या हिशोबावर मिळाल्या तर ते किती सोयीचं होईल! या विचारातून साकारली फ्रोटेल्स डॉट कॉमची कल्पना. या वेगळ्या व्यवसायातली आव्हानं, खाचाखोचा, त्यातलं उज्जवल भविष्य आणि प्रियांका कोथमिरेंचा इथपर्यंतचा प्रवास जरुर ऐका. तुम्हालाही असं काही जगावेगळं करण्याची प्रेरणा नक्की मिळेल.
Yritystoiminta ja sijoittaminen