भारतीय उद्योजकता क्षेत्रातलं एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून धनंजय दातार यांच्याकडे आदराने बघितलं जातं. व्यवसायाइतकंच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही त्यांचं योगदान आहे. दुबईत भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी ते उत्साहाने काम करतात. स्वतः गरिबीतून वर आल्याने आपल्याप्रमाणेच उद्यमाची आकांक्षा बाळगणाऱ्या गरीब तरुणांना मार्गदर्शनासाठी ते स्वखर्चाने गावोगावी जाऊन व्याख्यानं देतात आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांना साहाय्य पुरवतात. अमरावती ते दुबई हा ह्यांचा प्रवास जाणून घेण्यासारखा आहे.