मी समुद्रावर फिरायला गेलो असताना अचानक एक माणूस भेटतो. कपडे गबाळे, गरिबी दर्शवणारे पण चेहऱ्यावर हुशारी आहे. त्याच्याकडे असलेला एक मौल्यवान हिरा तो मला स्वस्तात विकायला तयार आहे. त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? परंतु आयुष्यात असे योग - संधी किंवा घबाड म्हणा, क्वचितच येतात. संधी एकदाच तर दार ठोठावते; इतर वेळी सगळे शेजारी असतात. अशावेळी मी नक्की काय करावे?
काल्पनिक कहानियां और साहित्य