प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी...... पोपटला खोतांच्या चित्रात काहीतरी गूढ संदेश आहे असे त्याला वाटत होतं. ही रंगांची भाषा काहीतरी वेगळी आहे असं त्याचं मत होतं. खोत आंधळे का झाले हे एक मोठेच गूढ होते. अशी विस्मय, गूढ यांनी भारलेल्या,गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी - दैत्यालय
Müsteeriumid ja põnevusromaanid