Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे. ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचणारी लघुकादंबरी... 'भयकथा' उदय सबनीस यांच्या आवाजात .