डॉ. जयंत विष्णू नारळीकरांचे नाव माहिती नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. हे प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्