बेबीची आई गेली, आणि तिचा भाऊ राघववर तिची जबाबदारी येऊन पडली. पण राघव मेंटल हॉस्पिटलला गेला, आणि तिथल्या वातावरणानं आतून पार पोखरून गेला. मेंटल हॉस्पिटलमधून सुटून येऊन तो आपल्या बहिणीला बेबीला येऊन भेटतो. तिला भेटल्यावर त्यांच्या भावा-बहिणीच्या नात्याचं काय होतं? आपण मुळात मेंटल हॉस्पिटलला का आणि कसं गेलो? याचा उलगडा राघवला कसा होतो? ही खिळवून ठेवणारी, राघवच्या भंजाळलेपणाची, बेबीच्या जगण्याची गोष्ट सांगणारं विजय तेंडुलकरांचं नाटक 'बेबी'
Skönlitteratur och litteratur